17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : अनेक डेडलाईन संपल्यानंतर या 30 जून रोजी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपली. ज्यांनी जोडणी केली नाही, ते पॅन कार्ड आता निष्क्रिय झाले आहेत. हे निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच अनेक आर्थिक व्यवहार तुम्हाला करता येणार नाही. तुमच्या आर्थिक व्यवहारांवर एक प्रकारे बंधने आली आहेत. पॅन कार्ड तुम्हाला पुन्हा सुरु करता येते. पण त्यासाठी आता एक हजारांचा दंड नाही तर त्यापेक्षा ही जबरी दंड भरावा लागणार आहे. निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास दहा हजारांचा दंड भरावा लागेल. तर यापूर्वी केलेली टाळाटाळा आता तुमच्या अंगलट येणार आहे.
इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे. तुम्ही आता आधार-पॅन लिंक करण्यासाठी प्रक्रिया केली तर 7 ऑगस्ट पर्यंत पॅन कार्डचा वापर करता येईल. 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल करता येणार नाही. आयटीआर फाईलिंग ही दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी एक महिनाही लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तितके विलंब शुल्क अदा करावे लागेल.
करदात्यांना फटका – पॅन-आधार कार्डची जोडणी न केल्याने 1 जुलैपासून पॅन निष्क्रिय झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान आयटीआर फाईल करणाऱ्यांचे झाले आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची गरज पडते. आयटीआर फाईल करण्यासाठी जुने पॅनकार्ड उपयोगात येणार नाही.
इतका भरावा लागेल दंड – पॅन कार्ड सुरु करण्यासाठी 1000 रुपये जमा करावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1 महिना लागतो. तर टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. ही मुदत संपली तर तुम्हाला 5000 रुपयांचे विलंब शुल्क अदा करावे लागेल. पॅन सुरु झाल्यानंतर आयटीआर फाईल कराल तर तुम्हाला 5000 रुपये विलंब शुल्क जमा करावे लागेल. म्हणजे एकूण 6000 रुपयांचा फटका बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *