17/06/2024
Spread the love

मुंबई, मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
चांगल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पेरणीला सुरुवात केली आहे. आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात सध्या चांगलाच पाऊस बसतोय. त्यामुळं येथील पाणीसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्णपणे भरले असून सध्या ओसंडून वाहत आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी या पावसानं हजेरी लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *