17/06/2024
Spread the love

मुंबई, मनसेचे अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात गुरुवारी 6 जुलै रोजी युतीबाबत चर्चा झाली. भेटीनंतर राऊत मातोश्री तर पानसे हे शिवतीर्थवर गेले होते. या भेटीत संजय राऊत यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तर पानसेंची राज मनसेप्रमुखांशी चर्चा झाली. त्यानंतर “मनसेसोबतच्या युतीबाबत ठाकरेंशी चर्चा झाली”, असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं. राज्यात अजित पवार यांच्या बंडानंतर मनसे-ठाकरे गट या नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली होती.
मात्र यानंतर आज 7 जुलै रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगत आहेत.
मनसे-ठाकरे गटाच्या युतीदरम्यान झालेल्या ठाकरे-मुख्यमंत्री भेटीमुळे आता मनसेप्रमुख हे शिंदेच्या की ठाकरेंच्या नक्की कोणत्या शिवसेनेसोबत जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मात्र मनसेप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. या तासभर चाललेल्या बैठकीत या 2 नेत्यांमध्ये राजकीय घडामोडींसदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *