17/06/2024
Spread the love

आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्व लोकांना सांगितले जाते. योगासनाने मनासोबतच शारिरीक आरोग्य सुधारते.आयुर्वेदातही योगाचे महत्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी योगा दिनाच्या विविध थीम असतात. या ही वेळी मानवता या थीमवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अनेक आजारांवरचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे योगा. विशेषत: महिलांसाठी योगा करणे आवश्यक आहे. कारण काही काळानंतर महिलांना गर्भाशय, ओवेरियन तसेच स्तनाच्या कर्करोगाशी संघर्ष करावा लागतो. अशा अनेक महिला आहेत ज्या योग्य वेळी गर्भधारणा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, एक योग आहे ज्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. खास योग दिनानिमित्त योगाच्या माध्यमातून गर्भाशय आणि अंडाशय कसे निरोगी ठेवता येऊ शकते.यासाठी कोणती योगासने करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.
तितली आसन – गर्भाशय आणि अंडाशय निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी नियमित तितली आसन करणे गरजेचे आहे. या आसनाने तुमचे पाय लवचिक होतील तसेच गर्भाशय आणि अंडाशय निरोगी राहण्यासाठी मदत होते.सर्वप्रथम सूर्याकडे तोंड करून बसा. यानंतर पाय अगदी सरळ ठेवा आणि मग पायाचे गुडघे वाकवून पायांचे तळवे एकमेकांशी जोडून घ्या. आता हाताने पायाचे तळवे धरा. यानंतर दोन्ही डोळे बंद करा. फुलपाखरासारखे दोन्ही पाय हलवा. हे आसन पाच मिनिटे करा. ज्या लोकांना गुडघ्याच्या तक्रारी आहेत त्यांनाही तात्काळ आराम मिळेल.
सेतूबंधासन – या आसनामुळे आपल्या शरीर-मनाचा उत्तम समन्वय साधता येतो. सेतूबंधासन आपल्या शरीरातील ताण दूर करून आराम मिळवून देतो.नावाप्रमाणेच सेतुबंधासन म्हणजे संपूर्ण शरीर पुलासारखे बनवणे. हे आसन केल्याने पोटाचे, पाठीचे, पायांचे, हातांचे स्नायू बळकट होतात, तसेच गर्भाशयही निरोगी राहते. हे आसन केल्याने ज्या महिला गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांना खूप मदत मिळेल. दीर्घ श्वास घ्या. यानंतर दोन्ही हात पायांच्या गुडघ्यांपासून दूर ठेवून तळवे जमिनीवर ठेवा. त्यानंतर तुमचे दोन्ही तळवे दुमडून नितंब खांद्यापर्यंत उचलण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास रोखून धरा आणि या स्थितीत रहा. आता तुमचे पाय सरळ करा. आपल्याला हे पाच वेळा पुन्हा करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *