17/06/2024
Spread the love

मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर शरद पवारांचे झंझावाती दौरे सुरू झालेत. पहिली सभा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्लात होत आहे.. ज्यांनी ज्यांनी पवारांची साथ सोडली, त्यांच्या मतदारसंघात जाऊन शरद पवार नेत्यांना आव्हान देत मतदारांना आवाहन करणार आहेत. शरद पवारांनी भुजबळांचाच मतदारसंघ का निवडला यावरून खमंग चर्चा सध्या सुरू आहेत.
अजित पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासाची दिशा बदलल्याने आठ दिवसांपूर्वी एकाच सत्कार समारंभात सहभागी होणारे हे दोन नेते एकाच मार्गावरून नाशिकला येत असले तरी दोघांच्या घड्याळातील वेळ वेगळी होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरीकडे पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसची मुलूख मैदानी तोफ छगन भुजबळ. दोघेही शक्ति प्रदर्शन करत आज नाशकात दाखल झाले.. मंडल आयोगाच्या मुद्यावरून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे, सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्द्यामुळे शरद पवारसोबत काँगेसचा हात सोडून पवारांची साथ देणारे आणि आता पवारांचीही साथ सोडून अजित दादांच्या गटात सहभागी होणाऱ्या छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासातील हे दुसरे राजकीय बंड आहे.
1999 शरद पवार यांच्या जवळ असणारे प्रदेशाध्यक्ष पद , गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असे महत्वाचे पद उपभोगणारे, अडीच वर्षे तुरूंगाची हवा खाल्ल्यानंतर ही शरद पवारांनी भुजबळ यांना मंत्रीपद दिले, तरीही भुजबळ यांनी ओबीसीचा मुद्दा पुढे करून पवारांची साथ सोडल्याने त्यांच्याच मतदारसंघात जाऊन भुजबळांना अस्मान दाखविण्याची रणनीती पवार गटाकडून आखण्यात आली आहे. भुजबळ वक्ते आहेत, सभा गाजविण्याचे कसब त्यांच्यात आहे. सलग चार टर्म पासून येवल्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने अजित दादांना भक्कम साथ देण्याऱ्या नेत्यालाच हादरा दिल्याने इतरांपर्यंतही पवारांच्या आक्रमकतेचा संदेश पोहचविण्याची त्याच्यावर हल्लाबोल करण्याची चाल पवारांनी खेळली आहे.
शरद पवार यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केले आहे, पुलोद पासून नाशिक जिल्हा पवारांच्या सोबत उभा राहिला आहे. त्यामुळे नव्या इनिंगची सुरवात करण्यासाठी त्यांनी बारामती, म्हाडा नव्हे तर नाशिकला पसंती दिली असून नाशिककरांना साद घातली आहे. पवारांच्याच मुशीत तयार झालेल्या रोहित पवारांनीही अजित पवार गटात सहभागी झालेल्यावर हल्ला करत पवार गटाचे इरादे स्पष्ट केलेत. ठाकरे गटानेही भुजबळांच्या विरोधात दंड थोपटले असून पवारांच्या सभेला रसद पुरवत पाठबळ दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *