17/06/2024
Spread the love

चांदी गुंतवणूकदारांची चांदी करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात चढउतार होत आहे. दोन महिन्यांपासून चांदीत घसरणीचे सत्र आहे. मे आणि जून महिन्यात चांदीचे दर कमी झाले. तरी पण चांदीतून गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली. त्यांना मोठा फायदा झाला. सध्या अमेरिकन बाजारातील घडामोडींचा सोने आणि चांदीवर मोठा परिणाम होत आहे. पण येत्या काही काळात हा दबाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने पण दरवाढीची सलामी दिली. 1 जुलै रोजी चांदीच्या किंमती वधारल्या. प्रति किलो 500 रुपयांची वाढ झाली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 5 जुलै रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. तर आज 6 जुलै रोजी किलोमागे चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढले. येत्या काही दिवसांत चांदीचा भाव अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑल इंडिया ज्वेलर्स एंड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव नितिन केडिया यांनी एक भीती व्यक्त केली आहे. त्यांच्यामते, येत्या काही काळात चांदीच्या उत्पादनात घट येऊ शकते. मॅक्सिको हा चांदी उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. तो मोठा चांदी उत्पादक देश आहे. पण काही नियमांतील बदल, पर्यावरणासंबंधीचे नियम यामुळे चांदी उत्पादनात घट येऊ शकते.
याशिवाय 2023 च्या पहिल्या चार महिन्यात पेरु या देशात चांदीच्या उत्पादनात 7% घसरण दिसून आली. चांदीचे उत्पादन घटल्याने त्याचे परिणाम आता दिसतील. मागणी जास्त असली तरी पुरवठा कमी आहे. त्यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *