17/06/2024
Spread the love

मुंबई, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल येवल्यातील नाशिकच्या येवल्यामध्ये सभा झाली. शरद पवार यांच्या या सभेदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे… मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे…, असं म्हणत आमदार रोहित पवार यानी शरद पवार यांचा पावसात भिजल्याचा हा फोटो शेअर केला आहे.
भाग गए रणछोड़ सभी,देख अभी तक खड़ा हूँ मैं… ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनीही फोटो शेअर केला आहे. याआधी शरद पवार यांचा निवडणुकीदरम्यानचा साताऱ्यातील असाच पावसातील फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोची आणि या फोटोची तुलना होत आहे. शिवाय हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

“मी राजकारणात कुणालाही शत्रू मानत नाही. राजकारणात मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण त्याचा अर्थ शत्रुत्व असतं असा नाही. “
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील ते त्यांच्यावर आहे पण कुणी एकत्र असेल तर आनंद आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. एवढंच नाही तर राजकारणाचा चिखल झाला असला तरीही त्यात बियाणं टाकायचं असतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आव्हाड आणि जयंत पाटील पक्षाचे अडसर आहेत का? असा प्रश्न विचारला असता, “पक्षाच्या बऱ्या वाईट काळात भक्कपणे, स्वतःच्या करिअरचा विचार न करता, पक्षाच्या विचारधारेसाठी पडेल ते करणारे हे लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान आहे” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “ना टायर्ड हूँ! ना रिटायर्ड हूँ”, वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवारांचा अजित पवारांना टोला
मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *