17/06/2024
Spread the love

मुंबई : सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या फिटनेससाठीही ओळखले जातात. अभिनेत्री म्हणू नका, किंवा मग अभिनेते ; आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत ही मंडळी कायमच शारीरिक सुदृढतेला महत्त्वं देतात. योगसाधना, पॉवर योगा, मसल एक्सरसाईज आणि व्यायामाच्या कैक प्रकारांना सेलिब्रिटींची पसंती असते. त्यासाठी त्यांची काही ठरलेली ठिकाणंही आहेत.
अनेकदा अमुक जिमबाहेर तमुक सेलिब्रिटी असे फोटो व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये सेलिब्रिटी व्यायाम करुन आल्यानंतरचे फोटो मोठ्या संख्येनं दिसतात आणि त्यांना नेटकऱ्यांची पसंतीही मिळते.
नुकतेच अभिनेत्री सारा अली खान आणि मॉडेल, अभिनेत्री मलायका अरोरा या दोघींचे फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत. जिथं ब्लॅक आऊटफिटमध्ये मलायका मुंबईतील वांद्रे येथील डिवा योगा येथे दिसली. तर, सारा पांढऱ्या शुभ्र आऊटफिटमध्ये खारमधील Pilates जिमबाहेर दिसली. ही दोन ठिकाणं पाहता मलायका आणि सारानं त्यांना पसंती दिली असून, तिथंच या अभिनेत्री योगा, व्यायामासाठी येतात हे कळत आहे.
सारा आणि मलायकानं आपल्या अनुशंगानं या ठिकाणांना दिलेली पसंती पाहता त्या शारीरिक सुदृढतेबाबत कमालीच्या सजग आहेत हेच स्पष्ट होत आहे. व्यायाम आणि योगसाधना या दोन्ही गोष्टींची सांगड हल्ली बहुतांश सेलिब्रिटी घालत आहेत. या दोन सौंदर्यवती त्याचंच एक उदाहरण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *