17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : आयटीआर (इन्कम टॅक्स रिटर्न)भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून प्रत्येक करदात्याने मुदतीपर्यंत आयटीआर भरणे अत्यावश्यक आहे. अनेकांना वाटते की ते घरभाडे (HRA) किंवा गृहकर्ज परतफेड यापैकी एकावरच आयकर कपातीचा दावा करता येते परंतु, या दोन्ही कपातींवर एकाच वेळी दावा केला जाऊ शकतो, ज्यासाठी आयकर कायद्यातही तरतुद आहेत. या कपातीचा एकत्रित दावा केला तर नक्कीच फायदा मिळू शकेल. घरभाडे आणि गृहकर्ज कर कपात एकत्रितपणे दावा करण्याचे तीन मार्ग आहेत.
एका शहरात अनेक लोकांचे स्वतःचे घर असते. मात्र, नोकरी आणि इतर गरजा यामुळे ते दुसऱ्या शहरात भाड्याने राहतात. असे लोक एचआरए आणि गृहकर्ज परतफेडीवर कर सवलत मिळण्याचा दावा करू शकतात. तुम्‍ही नोकरीच्‍या शहरात भाड्याने राहत असल्‍यास आणि तुमचे घर दुसर्‍या शहरात असल्‍यास एचआरए सोबत गृहकर्जावरील व्याजावर आयकर लाभाचा दावा केला जाऊ शकतो. एचआरए आणि गृहकर्ज वजावट दोन्ही एकत्रितपणे क्लेम करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुम्हाला पगारात एचआरए मिळाला तरच या योजनेचा लाभ मिळेल.
शहरांचा आकार दिवसेंदिवस मोठा होत आहे. अशा परिस्थितीत कार्यालयात ये-जा करण्यासाठी काही तास लागतात. हा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि ट्रॅफिक तसेच इतर समस्या टाळण्यासाठी बरेच लोक ऑफिसजवळ भाड्याने घर घेतात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की एकाच शहरात राहून तुम्ही दोन्ही कपातीवर दावा करू शकता का? यामध्ये काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे सिद्ध करू शकता की तुमच्या मालकीचे घर तुमच्या ऑफिसपासून खूप दूर आहे आणि म्हणून तुम्ही भाड्याने घर घेतले आहे, तर तुम्ही एचआरए आणि गृहकर्ज या दोन्हींमध्ये कर सूटीचा लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *