17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : कलियुगात संपत्तीसाठी सख्खे भाऊही एकमेकांचे वैरी होतील, अशी म्हण प्रचलित आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी अनेक जण प्रत्येक नात्याचा खून करायलाही तयार होतात. मग तो एकाच आईच्या पोटी जन्मलेला भाऊ असो किंवा खुद्द आई-वडील. अशा लोकांसाठी बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया ही म्हण बरोबर आहे. पण आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका व्‍यक्‍तिबद्दल सांगणार आहोत, जिने वडिलांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती नाकारली आणि संत जीवन अंगीकारले.
या व्यक्तीने आपले आलिशान, सुख-सुविधांनी सजलेल्या विलासी जीवनाचा त्याग करून साधूचे जीवन अंगिकारले. जर त्याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले असते तर तो आज जगातील बड्या अब्जाधिशांपैकी एक बनला असता. वेन अजहन सिरीपान्यो हा एका अब्जाधीशाचा मुलगा असून त्याचे वडील आनंदा कृष्णन यांची एकूण संपत्ती ४० हजार कोटी म्हणजे सुमारे ५ अब्ज डॉलर आहे. AK म्हणू ओळखले जाणारे कधीकाळी दुरसंचार क्षेत्रातील आघाडीचे भारतीय फोन कंपनी एअरसेलचे मालक होते, ज्यांनी दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीच्या नेतृत्वाची IPL संघ चेन्नई सुपर किंग्सला प्रायोजित केले होते.
मूळचा तामिळ दूरसंचार उद्योगपतीच्या घरी जन्मलेल्या सिरीपान्यो वडील कृष्णनच्या मेगा-अब्ज-डॉलर टेलिकॉम साम्राज्याचे, ज्यात टेलिकॉम, मीडिया, तेल आणि वायू, रिअल इस्टेट आणि उपग्रहांमधील व्यावसायिक हितसंबंधांचा समावेश आहे, नेतृत्व करणे अपेक्षित होते. कृष्णन यांचा एकूण ९ कंपन्यांमध्ये हिस्सा असून त्यांनी कमावलेली प्रचंड संपत्तीसह मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *