17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : विश्वास तर कसाच नाही बसणार, पण जगभरात केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात, या शहरात सर्वाधिक पगार देण्यात येतो. बेंगळुरु आणि मुंबई शहरापेक्षा पण या शहरात अधिक वेतन मिळते. जुलै, 2023 पर्यंतच्या सरासरी पगाराच्या सर्व्हेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, देशात काहींचा सरासरी पगार 18,91,085 रुपये आहे. तर सर्वसामान्यांची वार्षिक कमाई 5,76,851 रुपये आहे. महिला आणि पुरुषांच्या वेतनात मोठी तफावत आहे. पुरुष कर्मचाऱ्यांचे वार्षिक सरासरी वेतन 19 लाख 53 हजार रुपये तर महिला कर्मचाऱ्यांचे वार्षिक सरासरी वेतन 15 लाख 16 हजार रुपये आहे.
आता इथं या सर्वेक्षणावरच शंका येते. कारण या सर्व्हेनुसार, देशातील अनेक शहरात चांगला पगार आहे. पण सर्वाधिक पगार सोलापूर शहरात मिळतो, असा दावा करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ दोन जणांच या सर्व्हेत सहभागी करुन घेण्यात आले होते. याठिकाणी सरासरी वार्षिक 28 लाख 10 हजार 092 रुपये मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर मुंबईतील 1,748 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. या शहरात वार्षिक सरासरी 21 लाख 17 हजार रुपये वेतन आहे. तर बेंगळुरु शहरात वार्षिक सरासरी 21.01 लाख रुपये वेतन आहे. या शहरातील जवळपास 2,800 लोकांनी सहभाग घेतला होता. दिल्लीत वार्षिक सरासरी 20 लाख 43 हजार 703 रुपये वेतन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *