17/06/2024
Spread the love

पुणे : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये हाहा:कार माजला आहे. नवी दिल्लीतील ४० वर्षांचा विक्रम पावसाने मोडला आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रस्ते, पूल पाण्यामुळे वाहून जात आहे. शहरामधील रस्त्याचे रुपांतर नदीत झाले आहे. उत्तर भारतात पावसाचा कहर सुरु असताना महाराष्ट्रात अजून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नाही. यामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.
भारतीय हवामान विभगाचे अध्यक्ष मृत्यूंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, देशातील अनेक राज्यांमध्ये दोन मान्सून सक्रीय झाले आहे. एका म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि दुसरे म्हणजे बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारी वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि पश्चिम बंगालच्या उपसागरातून आलेले मान्सून वाऱ्याचे मिश्रण झाले. यामुळे हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरु आहे.
सध्या मान्सून पुणे, मुंबईत सक्रीय आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा, इगतपुरी या ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. मुंबई, ठाण्यासह अनेक हौशी पर्यटक याठिकाणी धबधब्यावर येऊन निसर्गाचा आनंद घेत आहे. पुणे शहरातील अनेक जण वर्षापर्यटनासाठी येत आहेत. शनिवार अन् रविवारी पर्यटकांची चांगली गर्दी लोणावळ्यात होत आहे. गर्दीमुळे लोणावळा पोलिसांनी लोहगडावर जाण्यासाठी नियमावली तयार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *