17/06/2024
Spread the love

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडमोडींना वेग आला आहे. वर्षभरापुर्वी शिवसेनेत बंडखोरी करत सत्तेवर आलेल्या शिंदे गटाच्या बाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. यावरून शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे पहायला मिळत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार गट हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाला आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राष्ट्रवादीचे नेते बोलणे टाळत आहेत. मात्र असे असाताना अजित पवार गटाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ याचं महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. त्यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे 16 आमदार उद्या अपात्र होणार आहेत. मात्र हा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. त्यामुळे त्यावर मी जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं म्हटलं आहे. त्यावर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *