17/06/2024
Spread the love

मुंबई, भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत करून यात असलेली व्यक्ती ही किरीट सोमय्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते या व्हिडीओवरून सोमय्या आणि भाजपाला लक्ष्य करत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बातचित केली. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांना किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवर प्रतिक्रिया विचारल्यावर ते संतापले. त्यांनी आधी विचारलं कोण किरीट सोमय्या? तसेच प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले, कोणाचंही नाव घ्यायचं आणि तुमचा टीआरपी वाढवायचा, असं सगळं सुरू आहे. रस्त्यावर दिगंबर साधू फिरतात ना, त्यांचे हवे तितके फोटो काढा आणि दाखवा तुमच्या टीव्हीवर, टीआरपीसाठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *