17/06/2024
Spread the love

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. ठिकठिकाणी पाणी साचल्याची दृश्ये समोर येत आहेत. राज्यातल्या महत्वाच्या शहरांमध्ये बाजारपेठा रस्ते, घरं पाण्याखाली गेली आहेत. मुंबईसह पुण्यात धो-धो पाऊस कोसळतोय. अशातच कोल्हापूर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे हाहा:कार पाहायला मिळतोय. राज्याच्या विविध भागातील पावसाचा आढावा घेऊयात…
कोल्हापूरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. धरण क्षेत्रासह शहर परिसरातही पहाटेपासून जोरदार पाऊस बरसतोय. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे. तर पाणी पातळी आता 36 फुटांवर पोहोचली आहे. 68 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरण 75 टक्के भरलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरही पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. आंब्याजवळ घोळसवडे पुलावर पाणी आलं आहे. पुलावर आलेल्या पाण्यातून धोकादायक अवस्थेत वाहतूक सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *