17/06/2024
Spread the love

मुंबई: “राज्य सरकारचंच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उलब्ध करुन देण्यात आलेल्या जवानांना विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालयं, व्यावसायिक प्रतिष्ठान, सार्वजनिक ठिकाणं इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आहे आणि वापरली जात आहे. त्यामुळे कुठेही कंत्राटी पद्धतीने पोलीस आपण घेत नाही आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“आपण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केलं होतं त्यावेळी यामध्ये आपण ज्यांना घेतो, आपली राज्याची विमानतळ आणि इतर आस्थापनांच्या ठिकाणी गार्डियनची ड्यूटी देतो. आता अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. तीन वर्ष भरती न झाल्यामुळे मोठा फरक पडला आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.
“आता जी भरती करतोय त्यापेक्षा जास्त ती करता येणार नाही. कारण तेवढी ट्रेनिंगची फॅसिलीटी नाहीय. त्यामुळे आपण 18 हजारांचीच भरती करतोय. त्यातील 7 हजार यांना मिळणार आहेत. तेही आता भरती आपली पूर्ण झालीय. आता ते ट्रेनिंगला जातील आणि दीड वर्षांनी येतील. त्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी 10 हजार पोलीस कमी ठेवून मुंबई सारखं शहर सुरक्षित ठेवता येत नाही. त्यामुळे कंत्राटी नाही, नेहमी आपण वेगवेगळ्या आस्थापनांना आपल्या महामंडळांतर्फे जसे पोलीस देतो तशाच प्रकारे देण्यात येत आहे. कुठेही पोलिसांचा कंत्राटी पद्धतीने वापर केला जाणार नाही. तो करण्याचा विचार देखील नाही”, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
“मी पत्र लिहून मागणी केली आहे की, एजन्सीन एजन्सी चार्जेसल किती घ्यायचे, त्याप्रमाणे कंत्राटी असला तरी त्याला नवीन नियमाप्रमाणे ग्रॅज्युअटी द्यावी लागते. फंडचे पैसे कापावे लागतात. पीएफचे पैसे कापावे लागतात. ते सगळे पैसे किती? त्याचा प्रत्येक पदाकरता उल्लेख झाला पाहिजे. त्याचं अकाउंट तयार केलं पाहिजे. त्या अकाउंटला ते पैसे जमा झाले पाहिजे”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *