17/06/2024
Spread the love

मुंबई, मुंबईसाठी पुढचे 12 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. विशेष म्हणजे कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *