16/06/2024
Spread the love

बॉलीवुड अभिनेत्री क्रिती सेनन हिने मनोरंजन विश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2014 मध्ये आलेल्या हिरोपंती चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. एका जुन्या मुलाखतीत क्रितीने घराणेशाही अर्थात नेपोटिझमवर भाष्य केलं होतं. आऊटसायडर असल्यामुळे तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाल्याचे क्रिती म्हणाली होती.
क्रिती म्हणाली होती -मी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि माझ्यात बरंच चांगलं काम करण्याची क्षमता आहे, हे मला माहीत आहे. मला काही ए-लिस्ट डायरेक्टर्ससोबत काम करायचे आहे. मला (आत्तापर्यंत) काही चांगल्या संधी मिळाल्या आहेत, पण (इतरांशी) तुलना करायची झाली तर आणखी अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मला खऱ्या आयुष्यात हव्या आहेत. त्या मिळवायला अजून बरंच अंतर पार करावं लागेल. पण दिग्दर्शकांकडे पोहोचायला, त्यांच्या कडे काम मागायला मला काही (कमीपणा) वाटत नाही.
मी जर एखाद्या फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून आले असते तर मला कामासाठी हात पसरायची (काम मागायची) वेळ आली नसती. माझी लोकांशी आधीच ओळख झाली असती, कुठे ना कुठे भेटलो असतो आम्ही. पण एका पॉईंटनंतर हे सगळं (ओळखी) नाही तर तुमचं कामच तुमच्यासाठी बोलतं. त्यानेच ओळख मिळते. पण मला तिथे पोहोचायला अजून थओडा वेळ लागेल किंवा जास्त हिट पिक्चर द्यावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *