17/06/2024
Spread the love

मुंबई – लोणावळा परिसरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे २३ जुलै रोजी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली होती. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पुणे आणि मुंबईकडील वाहतुकीतवर परिणाम झाला होता. ही वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दरड हटवण्याच्या कामासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक घेऊन महामार्ग सुरळीत करण्यात आला होता. आता पुन्हा हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. या सैल झालेल्या दरडी हटवल्या जाणार आहेत.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक असणार असल्यामुळे हलकी वाहतूक मॅजिक पॉईंटपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. परंतु जड वाहतुकीला या मार्गावर बंदी आहे. यामुळे जड वाहतूक जिथे आहे तिथेच थांबवणार आहे. मुंबईवरुन पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *