16/06/2024
Spread the love

पुणे: पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. कोयता गँगचा उपद्रव सुरु आहे. व्यापाऱ्यावर हल्ला झाला. बलात्काराची घटनाही घडली. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी बंदोबस्त केला असला तरी गुन्हेगारी कमी होत नाही. यामुळे कसबा मतदार संघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या प्रकरणी पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. पोलिसांनी शहरातील ६ हजार ११६ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. त्यापैकी ६०२ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगाराची घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *