15/06/2024
Spread the love

मुंबई : विक्रोळी परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास आपल्या पतीसोबत कारने चाललेल्या एका महिलेची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन आरोपींनी महिलेची छेडछाड केली. विशेष म्हणजे घटनेला 10 उलटले तरी आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. अखेर पीडितेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर छेडछाडीचा व्हिडिओ शेअर करत आपल्यासोबत घडलेली आपबीती आणि पोलिसांची भूमिका याबाबत सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडिओ पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
पीडित महिला 16 जुलै रोजी पतीसोबत कारने विक्रोळी पार्कसाईटजवळून चालली होती. यावेळी दुचाकीवरुन चाललेल्या तिघा आरोपींनी महिलेची छेडछाड काढली. याप्रकरणी महिलेने आधी विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. मात्र सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत टिळक नगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. टिळकनग पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेची तक्रार नोंदवून घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. पोलिसांनी 4 तास वाट पहायला लावत अखेर पहाटे 3 वाजता तक्रार नोंदवून घेतली.
तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस महिलेच्या पतीला गस्ती वाहनातून घटनास्थळ दाखवण्यासाठी घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा व्ही पी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले. यानंतर महिलेने अनेक वेळा व्ही पी नगर पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. दहा उलटून गेले तरी या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याप्रकरणी पोस्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *