17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण देशच नव्हे तर जग हादरून गेलं आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट आली आहे. संसदेपासून रस्त्यापर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. मात्र, आरोपींची ट्रायल मणिपूरऐवजी इतर राज्यात करणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे खासदार उद्या मणिपूरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
मणिपूर घटनेचे संसदेत पडसाद उमटले आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागत आहे. त्यामुळे सरकारने मणिपूरचं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील हिंसेच्या घटनेची प्रकरणे पूर्वोत्तर राज्यांबाहेर चालवण्याचं सरकार दरबारी घटत आहे. या प्रकरणी सरकार एक प्रतिज्ञापत्रही सादर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *