17/06/2024
Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यात तर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धरण क्षेत्रातही पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक धरणं तुडूंब भरून वाहू लागली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार आणि तानसापाठोपाठ मोडक सागर धरण ओसंडून वाहू लागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव काल रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मोडक सागर धरणाची पाणी पातळी 163.15 टीएचडी एवढी असून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणारे काही धरणे भरली असली तरी अजूनही इतर धरणे भरणे बाकी आहे. गेल्यावर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 1277787 दक्षलक्ष लिटर पाणीसाठा होता. आज हा साठा 891274 दशलक्ष लिटर एवढा आहे. मात्र, येत्या काळात पाणी साठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *