16/06/2024
Spread the love

दुधाला पूर्ण अन्न समजले जाते. त्यामुळे बहुतेक सर्व जण दूध पितात. पण, आपल्याला मिळणारे दूध किती सुरक्षित आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. दुधाचे पॅकेट तयार करत असताना त्यात पावडर मिक्स केले जाते. त्यामुळे दुधाची गुणवत्ता पाहिजे तशी राहत नाही. पण, दुध गाळा दिसावा, यासाठी या क्लुप्त्या केल्या जातात. आपल्याकडे नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे फावते. फारच कमी ठिकाणी भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होते. त्यामुळे आपल्याला मिळणारे दूध बहुतेक वेळा सुरक्षित नसते.
धुळ्यात भेसळयुक्त दुधाच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे ही धडक कारवाई करण्यात आली. दूध भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *