17/06/2024
Spread the love

मुंबई : पाटणा आणि बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, ही बैठक लांबण्याची शक्यता आहे. काँग्रेसने ही बैठक सप्टेंबरमध्ये घेण्याची विनंती केली आहे, त्यामुळे ही बैठक कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटलं. यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकीवर चर्चा करण्यात आली. ही बैठक सुरू असतानाच शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बैठकीबाबत चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. विरोधी पक्षातील जवळपास 100 नेते या बैठकीला येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. बंगळुरूच्या बैठकीला 26 पक्षांचे नेते होते. मुंबईतील बैठकीतील हा आकडा वाढू शकतो, असंही सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *