17/06/2024
Spread the love

मुंबई : प्रसिद्ध कामगार नेते डॉ. दत्ता सामंत मर्डर केसमधून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्या अभावी छोटा राजन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी छोटा राजनची सुटका केली आहे. तब्बल 26 वर्षानंतर छोटा राजनची या खटल्यातून मुक्तता झाली आहे. मात्र, तरीही छोटा राजनला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
16 जानेवारी 1997 मध्ये डॉ. दत्ता सामंत हे घाटकोपरच्या पंतनगरला जात होते. त्यावेळी पद्मावती रोडवर नरेश जनरल स्टोअरजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. ही हत्या छोटा राजन गँगने केल्याचा संशय होता. त्यामुळे छोटा राजन याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणाची विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर अखेर निर्णय आला असून ठोस पुराव्याच्या अभावी छोटा राजन ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याची सुटका करण्यात आली आहे. छोटा राजननेच डॉ. सामंत यांची हत्या केली. त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं सिद्ध करण्या इतपत पुरावे रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *