17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली: शेअर बाजारात अनेक मल्टिबॅगर स्टॉक आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. पण एखाद्या मल्टिबॅगर शेअरमुळे अवघ्या तीनच वर्षांत गुंतवणूकदारांना बंगला बांधता येऊ शकतो का? पण या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांना भरारी घेता आली. 18 रुपयांच्या शेअरवर अनेक गुंतवणूकदारांनी मोठी झेप घेतली. या स्टॉकने अनेकांना मालामाल केले. अवघ्या तीनच वर्षांतच ही किमया साधता आली. त्यामुळे अनेक जणांना हर्षवायू झाला आहे.
Aditya Vision हा तो शेअर आहे. या शेअरने अनेकांचे नशीब पालटवले आहेत. या कंपनीच्या शेअरने गेल्या तीन वर्षांत जोरदार तेजी दिसून आली. ही लांब उडी अनेकांच्या कल्पनेपलिकडील आहे. कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 18 रुपये होती. पण आता हा शेअर 2000 रुपयांपेक्षा अधिक झाला आहे.
गेल्या एका महिन्यात मॉडर्न मल्टि-ब्रँड कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीचा स्टॉक 35 टक्के परतावा दिला. तर गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहूनअधिकचा परतावा दिला. मल्टिबॅगर स्टॉक कोविड काळात विक्री झाली. त्यानंतर ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांचा मोठा फायदा झाला.
या मॅल्टिबॅगर स्टॉकने 2023 मध्ये पहिल्या तिमाहीत जोरदार कमाई केली. 11 मार्च 2020 रोजी या शेअरचा बाजार बंद होताना 18 रुपये भाव होता. 28 जुलै 2023 रोजी हा शेअर बाजार बंद होताना 2189.10 रुपयांवर होता. या शेअरचा सर्वकालीन उच्चांक 2465 रुपये होता. तर 52 आठवड्यांचा निच्चांकी भाव 879.50 रुपये होता.
या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर त्यांना बंगला बांधता आला असता. तीन वर्षांपूर्वी या शेअरचा भाव 18 रुपये होता. एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 5555 शेअर खरेदी करता आले असते. सध्या शेअरचा भाव 2190 रुपये आहे. त्याहिशोबाने आज या शेअरची किंमत 1,21,65,450 रुपये असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *