17/06/2024
Spread the love

मुंबई, 26/11 च्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील छाबाड हाऊस वर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने दोन अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडे या छाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे.आता या दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसचे फोटो सापडल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. या छाबडा हाऊसभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.पुणे एटीएसने 2 दहशतवादी तरुणांना अटक केलेली होती. या दोन तरुणांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाबा येथील छाबड हाऊसची गुगल इमेज मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे? त्यामुळे मुंबई पोलिसांकडून छाबड हाऊसची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात देखील छाबड हाऊस हे दहशतवाद्यांच टार्गेट होत. आता मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील इसीसचे मॉड्युल उद्धवस्त करण्यासाठी एमआयएने कडक कारवाईला सुरुवात केली आहे, याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्यातील डॉ. अदनान अली सरकारचा समावेश आहे. इसीसचे पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयन्त होता, मात्र एनआयएच्या कारवाईने तो प्रयत्न अयशस्वी झाला आहे.

एनआयएने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली आहे. ‘एनआयए’ कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा डॉ. अदनान अली सरकार आयएसच्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसारात सामील असल्याची माहिती मिळाली.

तो तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करत होता. अली सरकार हा पुण्यातील कोंढवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून राहत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *