17/06/2024
Spread the love

पालघर: जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. माथेफिरू कॉन्स्टेबलमुळे हकनाक चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? प्रवाशांवर गोळ्या का झाडल्या? असे सवाल त्याला करण्यात येणार आहेत. त्याच्या चौकशीतून या गोळीबाराचं नेमकं कारण समजणार आहे.
आज सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये हा गोळीबार झाला. कॉन्स्टेबल चेतन याने चौघांवर गोळ्या झाडल्या असून त्यात या चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आरपीएफचा एएसआय टीका राम याचा मृत्यू झाला आहे. टीका राम हा राजस्थानचा रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं.
एका पाठोपाठ धाड धाड गोळीबाराचा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी गोंगाट सुरू करताच आरोपी चेतनने दहिसरमध्ये चालत्या ट्रेनमधून उडी मारली. तर प्रवाशांनी तात्काळ बोगीत जाऊन पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही गोळीबाराच्या आवाजाच्या दिशेने धावलो. एएसआय साहेब मरून पडलेले होते. त्यांच्या बाजूला तीन प्रवाशांचे मृतहेदही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या बोगीत सर्वत्र रक्तच रक्त होते. हे पाहून आम्हाला धक्काच बसला, असं एका प्रवाशाने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *