17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : टोबॅको उत्पादनात अग्रेसर असलेल्या आयटीसीने गेल्या दशकात आपला पसारा प्रचंड वाढवला. एफएमसीजी बाजारात कंपनीने दबदबा वाढवला. थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून अनेक उत्पादनाचे ब्रँड बाजारात उतरवले. कंपनी हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून मांड ठोकून आहे. हॉटेल व्यवसायाला उभारी देण्यासाठी आयटीसीने विलगीकरणाची घोषणा केली. त्यानंतर बाजारात आयटीसीचा शेअर गडगडला. डिमर्जरचा फायदा होत असतानाही शेअरधारकांनी नाखूशी दर्शवली. बाजाराचा कल आयटीसीने लगेच हेरला. त्यातच एक अपडेट समोर आल्याने आयटीसीने आता नवीन खेळी खेळली आहे. त्यामुळे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनी पेचात सापडली आहे.
गेल्या आठवड्यात आयटीसीने हॉटेलिंग व्यवसाय स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. देशात अनेक मेट्रो शहरात आणि पर्यटनस्थळी आयटीसीच्या हॉटेल्स आहेत. हॉटेल व्यवसाय तेजीत आणणे आणि एफएमसीजी व्यवसायात अजून भरारी घेण्यासाठी डिमर्जरचा निर्णय घेण्यात आला. दोन उद्देश साध्य करण्यासाठी कंपनीने डिमर्जरची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *