17/06/2024
Spread the love

पुणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज मोदी वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे एकत्र बॅनर्स झळकले आहेत. बॅनरवर असलेल्या शरद पवार यांच्या फोटोमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *