17/06/2024
Spread the love

गेल्या अनेक दिवसांपासून भारत सोडून परदेशात राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. जगातील अनेक देश इतके महाग आहेत की, तिथे राहणे सोप्प नाही. अनेक लोकांना वाटते की, जगातील सर्वात महागडे देश अमेरिका आणि ब्रिटन आहेत. पण ही गोष्ट सत्य नाही. रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महागडा देश बर्म्युडा आहे. टॉप-10 यादीत इतर कोणते देश आहेत माहिती आहे का?
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सने सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटरवर जगातील महागड्या देशांची माहिती दिली आहे. टॉप-10 महागड्या देशांमध्ये बर्म्युडा, स्वित्झर्लंड, कॅमेन आयलँड, बहामास, आईसलँड, सिंगापूर, बारबोडास, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, बर्म्युडा जगातील सर्वात महागडा देश आहे. उत्तर अटलांटिक महासागारातील ते एक बेट आहे. या यादीतील 140 देशांपैकी येथील राहण्याचा खर्च, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वात जास्त आहे.
तर महागड्या देशात तिसऱ्या स्थानावर केयमन आईसलँड आहे. या देशात प्रत्येक महिन्याला, खाणे-पिणे, कपडे, औषधोपचार, मनोरंजन, दळणवळण आणि इतर खर्च मिळून महिन्याला एक लाख रुपयांहून अधिकचा खर्च येतो. चौथ्या आणि त्यानंतरच्या क्रमांकावर इस्त्राईल हा देश आहे. या देशात महागाईने कळस गाठला आहे. येथे राहणे सर्वाधिक खर्चिक आहे.
या यादीत 9व्या आणि 10व्या क्रमांकावर डेनमार्क आणि बारबाडोस हे दोन देश आहेत. येथे राहणेच नाही तर दैंनदिन जीवनातील वस्तू पण महाग आहे. या देशात दळणवळणासाठी अधिक खर्च करावा लागतो. जगातील महागड्या देशांची यादी दरवर्षी बदलते. त्यात उलटफेर होतो. पण बर्म्युडा, स्वित्झर्लंड आणि डेनमार्कसारखे देश या यादीतून बाहेर पडत नाहीत.
वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्स नुसार, भारत आणि पाकिस्तान जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे. या यादीत पाकिस्तानचा क्रमांक 140 वा तर भारताचा क्रमांक 138 वा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *