17/06/2024
Spread the love

मुंबई : समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे इथे काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पुलाचं काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्याने अपघात झालाय. या अपघातात 16 कामगारांचा मृत्यू झाला. तर एका जखमी कामगाराला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोघांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
समृध्दी महामार्गावरच्या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट दु:ख व्यक्त केलं. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.
आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *