17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी अर्थसत्ता होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी यांनी 2028 चा उल्लेख केला. अमेरिका, चीन नंतर भारताची अर्थव्यवस्था असेल असे त्यांनी सांगितले. अर्थात हा दावा त्यांनी हवेत केलेला नाही. भारताने दुसऱ्या टर्ममध्ये जोरदार मुसंडी मारली. मंदीसदृश्य घडामोडीत इतर अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या असताना भारताचे वारु उधळले आहे. ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर, मेडिसीन, टेक्नॉलॉजी या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. पुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन होण्याचा अर्थ आहे तरी काय,त्यासाठीचा रोडमॅप कसा आहे, माहिती आहे? सध्या काय स्थिती आहे, आकड्यांचा दावा तरी काय?
भारतीय अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षांत आगेकूच करेल. आर्थिक वृद्धी दर 7 टक्के होईल. भारत जगात तिसऱ्या स्थानी राहिल. GDP च्या वृद्धीनुसार, भारत 2047 मध्ये स्वातंत्र्याचा 100 व्या वर्षात असेल. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था 20 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचेल, असा दावा करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *