17/06/2024
Spread the love

सिगारेट्स पिणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे सिगारेट्स पाकिटावर सरकार वैधानिक इशारा छापत असते. आता कॅनडा देशाने त्यांच्या नागरिकांनी सिगारेट्सचे व्यसन सोडावे यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी एक नवीन निर्णय घेतला आहे. कॅनडा सरकारने म्हटले आहे की विक्री होणाऱ्या प्रत्येक सिगारेट्सवर व्यक्तिगत स्वास्थ्य चेतावणी दिली जाणार आहे. असे करणार कॅनडा हा जगातील पहिला देश ठरणार आहे.
आता इथून पुढे कॅनडात विकली जाणाऱ्या प्रत्येक सिगारेट्सवर स्वास्थ्य चेतावणी लिहीली जाईल. सिगारेट्सवर लिहीले जाईल की सिगारेट्सने नपुंसकता आणि कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. याच बरोबर प्रत्येक झुरक्या सोबत विष असेही सावधानतेच्या सूचनेत लिहीलेले असेल. कॅनडा सरकारला वाटते की यामुळे देशातील सिगारेट्स पिणाऱ्यांच्या प्रमाणात कमी येईल.
कॅनडाने गेल्या मे महिन्यात स्वास्थ्य संबंधी नियमावली जारी करण्याचे जाहीर केले होते. त्याची जगभरात चर्चा झाली होती. तम्बाकू उत्पादनांची पॅकेजिंग आणि चेतावनी नियम सरकारने अशा युवकांसाठी तयार केले आहेत जे सिगारेट्स सोडू इच्छीत आहेत.
सिगारेटवर छापलेली वैधानिक इशारा सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींना सहज दिसेल असा छापला जाणार आहे. लोक एक सिगारेट्स विकत घेऊन पितात. त्यामुळे असे लोकांना पाकिटावर छापलेल्या सूचना दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सिगारेट्सवर सूचना छापण्याची गरज निर्माण झाल्याचे कॅनडाचे माजी व्यसनमुक्ती मंत्री कॅरोलिन बेनेट यांनी सांगितले. प्रत्येक सिगारेट्सवर छापलेली सूचना पाहून लोकांचे लक्ष जाईल. या नियमाद्वारे 2035 पर्यंत देशातीस तम्बाकूजन्य पदार्थांची विक्री पाच टक्के कमी करण्याची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *