17/06/2024
Spread the love

अहमदनगर, नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण नवं नाही. हा वाढता गोंधळ पाहून गौतमीने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदनगरमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला आहे. नागापूर येथे एका लहान मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतम पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर हुल्लडबाजांनी दगडफेक केली.दगडफेकीनंतर कार्यक्रमांमध्ये गोंधळ निर्माण होऊन धावपळ सुरू झाली. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र गौतमीला आपला कार्यक्रम बंद करावा लागला. यावेळी गौतमी पाटीलने या हुल्लडबाज लोकांना खडसावलं दगडफेक करायची असेल तर कार्यक्रमाला येऊ नका.तसेच परदेशातूनही मला कार्यक्रमासाठी विचारणा करण्यात आलं गौतमी म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *