17/06/2024
Spread the love

ठाणे: शहरातील प्रसिद्ध अशा बांदोडकर आणि जोशी बेडेकर कॉलेजमध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याचे प्रकरण भलतेच तापले आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली असून विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या घटनेविरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले असून आज सकाळपासून कॉलेजबाहेर विविध राजकीय पक्षांचे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान या मारहणा प्रकरणातील वरिष्ठ विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय क्षेत्रातून याबाबत आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या यानंतर महाविद्यालय प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मात्र केवळ विद्यार्थ्यावरच नव्हे तर कॉलेजच्या प्राचार्यांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी राजकीय संघटनांकडून करण्यात येत आहे.
सकाळपासूनच विविध राजकीय पक्ष कॉलेजबाहेर आंदोलन करत असून तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातीलत युवासेना महाविद्यालयाच्या गेट समोर घोषणाबाजी करत महाविद्यालय येथे निवेदन देण्यासाठी गेले होते. तसेच शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या वतीने काही तरूण टाळे ठोकण्यासाठी आले असता पोलिसांनी मज्जाव केला .
जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ माजली. जोशी बेडेकर कॉलेजच्या आवारात दोडकर,बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपण एनसीसीचे ट्रेनिंग देण्यात येते. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पावसामुळे आवारात पाणी साचले होते, रिमझिम पाऊसही पडत होता. त्या वातावरणातही कॅडेट्सना ट्रेनिंग देण्यात येत होते, ते पुश-अपस करत होते. मात्र ते नीटपणे करणे ज्या विद्यार्थांना जमत नसलेल्या विद्यार्थांना एक व्यक्ती काठीने बेदम मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. दुसऱ्या एका विद्यार्थाने गुपचुपपणे हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो बघता बघता व्हायरल झाला. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारे देण्यात येणारी ही शिक्षा अमानवी असल्याचे मत व्यक्त होत असून विद्यार्थ्यांमध्येही दहशत पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *