17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली: भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज नव्या विक्रमाची साक्षीदार ठरली. विविध आघाडीच्या ब्रँड्सने जोरदार विक्री केली. भारतीय बाजारात गेल्या महिन्यात 3.52 लाख कारची विक्री झाली. महागाईचा वरचष्मा असताना, ईएमआयचे ओझे असताना, व्याज दर चढा असताना हा चमत्कार घडला.

वार्षिक आधारावर जुलै महिन्यात विक्रीत 3 टक्के वाढ झाली. तर महिन्याच्या आधारावर 7.4 टक्के वृद्धी दिसून आली. देशात महागाई दिवसागणिक नवनवीन रेकॉर्ड करत असताना कार वृद्धीत होणारा विक्रम अर्थतज्ज्ञांना अचंबित करणारा आहे. भारतीय मध्यमवर्ग सधन होत असल्याचे आणि नवीन मध्यमवर्ग वाढत असल्याचे हे द्योतक तर नाही ना? का यामागे इतर काही कारणे आहेत.

मारुती सुझुकीने कार विक्रीत आघाडी घेतली. जुलैमध्ये या कंपनीने 1,52,126 कारची विक्री केली. वार्षिक आधारावर कंपनीने 6.5 टक्के वृद्धी नोंदवली. हुंदाई विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या कंपनीने 50,701 युनिटची विक्री केली. वार्षिक आधारावर हा वृद्धी दर 0.4 टक्के आहे. मासिक आधारावर कंपनीने 1.4 टक्क्यांची वाढ नोंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *