17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली, प्राप्तिकर रिटर्न फाईल करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने आयटीआर फाईल करण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. आता 31 डिसेंबरपर्यंत आयकर भरता येतो. पण त्यासाठी 5000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण आता त्यात एक आनंदवार्ता आली आहे. केंद्र सरकारने करदात्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता अनेक करदात्यांना 31 जुलैनंतर पण ITR भरल्यानंतर कोणताचा दंड द्यावा लागणार नाही. प्राप्तिकर विभागाने याविषयीचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी मुसळधार पावसाने उत्तर भारतातच नाही तर पश्चिम आणि दक्षिण राज्यात हाहाकार माजवला. इंटरनेट, वीज यंत्रणा कोलमडली. त्यामुळे अनेक करदात्यांना वेळेत प्राप्तिकर रिटर्न दाखल करता आला नाही. करदात्यांनी अंतिम मुदत वाढविण्याची विनंती केली होती. पण केंद्र सरकारने ही तारीख वाढवली नाही. सध्या आयटीआर फाईल करणाऱ्या करदात्यांना कोणताच दंड भरावा लागणार नाही, असे आयकर खात्याने स्पष्ट केले.
आयटीआर फाईल केला नसेल तर करदात्यांना दंडाची रक्कम भरावी लागते. सोबतच बिलेटेड आयटीआर फाईल करावा लागेल. पण त्यापूर्वी आयकर खात्याच्या या नियमांवर नजर टाका. या अधिनियमानुसार, डेडलाईन संपल्यानंतर आयटीआर दाखल करण्यासाठी करदात्यांना विलंब शुल्क देण्याची गरज नाही.
ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न मुळ सवलत मर्यादेपेक्षा अधिक नाही, अशा करदात्यांना हा दिलासा मिळाला आहे. त्यांनी उशीरा आयटीआर फाईल केला तरी त्यांना कोणताही दंड द्यावा लागणार नाही. आयकर अधिनियमाच्या कलम 234F मध्ये याविषयीची सवलत देण्यात आली आहे.
नवीन कर प्रणालीत करदात्यांना त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नावर एकूण 3 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. तर जुन्या कर प्रणालीत बेसिक सवलतीची मर्यादा वेगवेगळी आहे. यामध्ये 60 वर्षांपर्यंतच्या करदात्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. तर 60 ते 80 वर्षांमधील लोकांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळते. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या करदात्यांना 5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *