17/06/2024
Spread the love

जाणून घ्या सोप्या पद्धतीने बिजनेस करण्याचा मार्ग- व्यवसाय हा तार्किक म्हणजेच तोलूनमापून केलेल्या कृतीचा आणि धोरणांचा खेळ समजला जातो. प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायात शिखर गाठायचे असते. पण ते कसे गाठायचे हा प्रश्न त्याचासमोर असतो. याबाबत श्रद्धा सुब्रमणिअन, इंट्युशन एक्स्पर्ट, संस्थापक आणि सीईओ यांनी सांगितलं आहे.
अनेकांना वाटते की, जितके जास्त काम होईल, तेवढी व्यावसायिक प्रगती जास्त होईल. पण असे करताना ती व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जाते. या थकव्यामुळे एकाच ठिकाणी अडकून राहिल्याची भावना निर्माण होते. कारण परिणाम साध्य करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काम करणे हा एकच पर्याय असतो आणि एक व्यक्ती किती काम करू शकते याला एक निश्चित मर्यादा असते. हे काम केल्यानंतर फावला वेळच उरत नाही आणि व्यवसाय संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकतो. सगळी ऊर्जा व्यवसायातच खर्च होते आणि सगळे लक्ष व्यवसायाकडेच द्यावे लागते.
स्वतःचा ‘बॉस’ असल्याची कल्पना विरून जाते आणि असे व्यावसायिक आपल्याच व्यवसायाचे गुलाम होतात. आपल्या ग्राहकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अनेकांना दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे ७ दिवस सजग राहावे लागते आणि या सर्व बाजूंनी विचार करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारे सजग न राहिल्यास FOMO अर्थात फिअर ऑफ मिसिंग आउट (इतरांच्या तुलनेने मागे राहणे) ही भावना निर्माण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *