16/06/2024
Spread the love

कोथिंबीरचा भाव घसरल्याने लातूर जिल्ह्यातल्या कुमठा येथील शेतकऱ्याने कोथिंबीरवर ट्रॅक्टर फिरवला आहे.
मागच्या महिन्यात कोथिंबीरला चांगला भाव होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता.
मागच्या काही दिवसांपासून कोथिंबिरीला लागवड आणि वाहतुकीचा खर्च निघेल इतकाही भाव मिळत नाही.
कोथिंबीरच्या कॅरेटला सध्या पन्नास रुपये मिळतायत, त्यामुळे कोथिंबीर बाजारात नेण्यापेक्षा काढून टाकलेली बरी असा विचार शेतकरी करीत आहेत.
उदगीर तालुक्यातल्या कुमठा येथील शेतकरी अतुल केंद्रे यांनी देखील भाव घसरल्याने आपल्या एक एकरावरील कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *