17/06/2024
Spread the love

कमी वजनामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका उद्भवू शकतो. कारण शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक ती पोषक तत्वे मिळत नाहीत. कमी वजन असणाऱ्या लोकांना या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कौटुंबिक इतिहास, हाय मेटाबॉलिज्म, जास्त शारीरिक हालचाली, कोणताही जुनाट आजार, मानसिक आजार इत्यादी अनेक कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन कमी होऊ शकते. वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास वजन वाढूही शकते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया…
दूध – दररोज दूध प्यायल्याने आपल्या शरीराला कॅल्शिअमसह फॅट्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. स्नायूंच्या निर्मितीसाठी प्रोटीन्स आवश्यक आहेत. व्यायामानंतर सोया दुधापेक्षा स्किम मिल्कचे सेवन करणे तुमच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर ठरते, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.
तांदूळ किंवा भात – तांदूळ हे कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्त्रोत मानले जातात. ज्यामुळे वजन वाढण्यास खूप जास्त मदत होऊ शकते. एक कप तांदूळामध्ये सुमारे 200 कॅलरी असतात. तांदूळ शिजवणे आणि ते पचणेही खूप सोपे असते.
रेड मीट – स्नायूंसाठी रेड मीट खूप फायदेशीर मानले जाते. तसेच ते अमिनो ॲसिडचाही उत्तम स्त्रोत आहे.
नट्स आणि नट्स बटर – वजन वाढवायचे असेल तर जास्त कॅलरी असलेले पदार्थ खावेत. नट्स आणि नट्स बटरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. मूठभर बदामामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन्स आणि 18 ग्रॅम हेल्दी फॅट्स असतात. याशिवाय तुम्ही नट्स बटरचे सेवन करू शकता, यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप जास्त असते.
ॲवाकॅडो – ॲवाकॅडो मध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी हे फळ खूपच फायदेशीर ठरते. एका मोठ्या ॲवाकॅडो मध्ये 322 कॅलरीज, 29 ग्रॅम फॅट्स आणि 17 ग्रॅम फायबर असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *