17/06/2024
Spread the love

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केली होती. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंहची जोडी आणि त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. वीकेंडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेने नवव्या दिवशी ११.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ९०.५८ कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे, या चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १४६.६ कोटींची कमाई केली आहे. १६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अजूनही आपले बजेट पूर्ण करू शकलेला नाही.
भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अद्याप १०० कोटींचा टप्पा पार केला नाही. नऊ दिवसातही या चित्रपटाला १०० कोटींचा टप्पा पार करता आलेला नसल्याने याबद्दल चर्चा सुरू आहे. चित्रपटाचं बजेट आणि त्याला मिळणारा प्रतिसाद बघता हा टप्पा खरंतर ५ दिवसांतच पार करायला हवा होता. तर दुसरीकडे पुढील आठवड्यात ‘OMG 2’ आणि ‘गदर 2’ हे आणखी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अशा परिस्थितीत रणवीर सिंग आणि आलियाचा हा रोमँटिक चित्रपट कितपत बिझनेस करू शकतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *