17/06/2024
Spread the love

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त शाहरुखच नाही तर, अभिनेत्याची लेक सुहाना खान देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सुहाना अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकली नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम चर्चेत असते. सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुहाना सिनेमाबद्दल अनेक महत्त्वाचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. सुहाना आणि शाहरुख खान यांचे चाहते ‘द अर्चिस’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘द अर्चिस’ सिनेमानंतर सुहाना हिने आणखी एक सिनेमा साईन केला आहे. सुहाना हिच्या करियरसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे किंग खानच्या लेकीच्या करियरमध्ये करण जोहर याचा मोलाचा वाटा असणार आहे.
करण जोहर याने नुकताच सात वर्षांनंतर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण केलं आहे. आता करण त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्टनुसार, करण त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. करण जोहर याचा आगामी सिनेमा कोणत्याही जुन्या सिनेमाचा सिक्वल किंवा रिमेक नसून नव्या कथेवर आधारलेला असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *