17/06/2024
Spread the love

पुणे : राज्यात पावसाळा आला की खड्ड्यांची चर्चा सुरु असते. दरवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होते. त्यासाठी आंदोलने केले जातात. उपोषण केले जाते. लोकप्रतिनिधी अन् शासकीय कार्यालयात नागरिक चकरा मारतात. या सर्व प्रयत्नानंतर अनेकवेळा खड्डेमुक्त रस्ते होत नाहीच. आता पुणे जिल्ह्यातील भूगाव ग्रामस्थांनी ‘गाव करील ते राव काय करील’, या म्हणीची प्रचिती आणून दिली आहे. गावकऱ्यांनी आपल्या गावात रस्ते तयार केले आहेत. त्यांनी आपले गाव खड्डेमुक्त केले आहे. गावकऱ्यांचा हा पॅटर्न आता चांगलाच चर्चेत आला आहे. गावकऱ्यांनी काय केले? ज्यामुळे गावात रस्ते उभे राहिले, त्याची चर्चा होऊ लागली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भूगाव सध्या चर्चेत आले आहे. पुणे शहरापासून फक्त २१ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या फक्त ५ हजार ९४९ आहे. या लहान गावाने राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गावात चार वर्षांपासून रस्त्यांची समस्या होती. त्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा शासकीय कार्यालयाच्या खेट्या मारल्या. अधिकाऱ्यांना गावात रस्ते करण्याचासंदर्भात निवेदन दिले. परंतु ही समस्या काही सुटली नाही. मग गावकऱ्यांनीच पुढाकर घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *