17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेसकडून खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. अजूनपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा का केलेला नाही? असा सवाल गौरव गोगाई यांनी विचारला. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का बर्खास्त केलं नाहीय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्प राहण्यामागे तीन कारण आहेत. त्यातून त्यांच अपयश स्पष्ट दिसतं.
गौरव गोगोई यांनीच अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यांनीच सभागृहात चर्चेची सुरुवात केली. गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदींच्या गप्प राहण्यामागे 3 कारण सांगितली.
“राज्य सरकारच अपयश हे पहिलं कारण आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हिंसाचार नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले. मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावेळी ते म्हणाले की. अशी शेकडो प्रकरण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना बर्खास्त का नाही केलं?” असा सवाल गौरव गोगोई यांनी विचारला.
अविश्वास प्रस्ताव चर्चेच्यावेळी गौरव गोगोई यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही निशाणा साधला. “गृह विभाग आणि NSA काय करतायत? शस्त्रास्त्र आणली जातायत हे त्यांना समजलं नाही. मणिपुरात पोलीस स्टेशनमधून शस्त्रांची चोरी सुरु आहे. 5 हजारपेक्षा घातक शस्त्र लोकांकडे आहेत” असं गौरव गोगोई म्हणाले. गृहमंत्र्यांनी मणिपूरचा दौरा केला होता. शांततेसाठी अपील केलं. पण फायदा झाला नाही. ‘तेव्हा सुद्धा मोदी गप्प होते’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *