17/06/2024
Spread the love

नवी दिल्ली : शेअर बाजार लवकरच नवीन उच्चांक गाठणार आहे. गेल्या जुलै महिन्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरांच्या इंडेक्स सेन्सेक्सने 66,000 अंकांचा ऐतिहासिक टप्पा नुकताच गाठला होता. शेअर बाजारातील ही तेजी अशीच कायम राहिल, असा दावा दिग्गज इक्विटी गुंतवणूकदार विजय केडिया यांनी केला. त्यांची बीएसईच्या यादीत 15 कंपन्यांमध्ये एक एक टक्क्यांपेक्षा अधिकची हिस्सेदारी आहे. बेंचमार्क इक्विटी इंडेक्स BSE Sensex चालू कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत 70,000 अंकाचा पल्ला सहज गाठेल, असा दावा त्यांनी केला आहे. पण या दोन शेअरपासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
15 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी
विजय केडिया हे दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांची बीएसईच्या 15 कंपन्यांमध्ये एक एक टक्का हिस्सेदारी आहे. सोमवारी, 7 ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने 65,953 अंकाचा टप्पा गाठला होता. बेंचमार्क इक्विटी इंडेक्स BSE Sensex चालू कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत 70,000 अंकाचा पल्ला सहज गाठेल, असा दावा केडिया करत आहेत. वार्षिक आधारावर सेन्सेक्स 8 टक्क्यांची वाढ दाखवत आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार यावर्षी 1 जानेवारीपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा ओतला आहे. परदेशी पाहुण्यांनी इक्विटी बाजारात 1.21 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशातील गुंतवणूकदार संस्थांनी याच कालावधीत 87,491 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
शेअर बाजारात काही सेक्टरमध्ये बुमिंग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. विजय केडिया यांनी सांगितले की, दोन्ही सेक्टरवर गुंतवणूकदार त्यांचा निर्णय घेऊ शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका यामध्ये येत्या काही दिवसांत मोठी वाढ दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. टेलिकॉम सेक्टरमध्ये पण येत्या काही दिवसांत मोठा उलाढाल होईल, असा दावा त्यांनी केला.
बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 7 ऑगस्टपर्यंत सर्वात जास्त 30 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. बीएसई रिअॅलिटी, हेल्थकेअर, ऑटो आणि एफएमसीजी इंडेक्समध्ये क्रमशः 26%, 23%, 22%, आणि 17% वृद्धी दिसून आली. टेलिकॉम, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल्स आणि बँकिंग सेक्टरमध्ये आतापर्यंत 4 ते 9 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *