17/06/2024
Spread the love

करण जोहरचा‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’हा चित्रपट लोकांना खूप आवडला असून त्याला बराच रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटातील अनेक प्रसंग लोकांना आवडले असून आलिया भट्टच्या लूकचीही खूप प्रशंसा होत आहे. त्याचदरम्यान चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आलिया भट्टच्या लग्नातील मेंदीवरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.
खरंतर करण जोहर नुकतच म्हणाला होता की चित्रपटातील रील लाइफ लग्नातील आलियाची मेंदी आणि रिअल लाइफमधील लग्नाची मेंदी एकच होती. त्यावर आता चित्रपटात आलियाच्या हातावर मेहंदी काढणाऱ्या प्रसिद्ध मेंदी कलाकार वीणा नागदा यांची कमेंट समोर आली आहे. त्यानी करण जोहरचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत त्याची पोलखोल केली आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटातील रील लाइफ वेडिंग सीनसाठी आलिया भट्टने हातावर मेंदी लावली होती. ज्यावर करण जोहरने एक स्टेटमेंट दिले होते की, ‘आलिया आणि रणबीर कपूरच्या (रिअल लाइफ) लग्नानंतर आम्ही हे गाणे 4 दिवसांनी शूट केले. त्यावेळी आलियाचे एकाच आठवड्यात दोनदा लग्न झाले होते. एक खऱ्या आयुष्यात आणि दुसरं रील लाईफमध्ये. चित्रपटात दाखवलेली वेडिंग मेंदी ही आलिया भट्टच्या ओरिजनल लग्नातील मेंदीच होती. पुन्हा तेच डिझाईन काढत आम्ही ती मेंदी गडद केली, असे तो म्हणाला. या गाण्याचे शूटिंग जैसलमेरमध्ये झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *