17/06/2024
Spread the love

मुंबई, मुकेश अंबानी यांना वेतनासह त्यांना सर्व प्रकारचे भत्ते, सेवानिवृत्तीचा लाभ, कमीशन, स्टॉक ऑपशन्सचे लाभ, अनुषांगिक भत्ते इतर लाभ देण्यात येत होते. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, अंबानी यांची एकूण संपत्ती 95.1 अब्ज डॉलर इतकी आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते सध्या 11 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 7.96 अब्ज डॉलरची वाढ झाली.
मुकेश अंबानी गेल्या तीन वर्षांपासून वेतनच नाही तर कोणतेच लाभ घेत नाहीत. मग त्यांचे घर चालते तरी कसे? इतका खर्च भागतो तरी कसा, त्यांची कमाई कशी होते, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यावर गुंतवणूक तज्ज्ञ नितीन केडिया यांनी ललनटॉपला माहिती दिली. अंबानी पगार घेत नसले तरी कंपनीच्या लाभांशातून होणार फायदा, IPL टीम मुंबई इंडियन्समधून कमाई, त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीचा फायदा त्यांना होतो.
कंपनी दरवर्षी फायदा शेअरधारकांमध्ये वाटते. त्यालाच लाभांश असं म्हणतात. समजा, कंपनीला 200 रुपयांचा फायदा झाला तर त्यातील 100 रुपये उद्योग वाढीसाठी राखून ठेवले जातात. तर 100 रुपये शेअरधारकांमद्ये वाटप होतात.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आकड्यानुसार, अंबानी कुटुंबियांसह प्रमोटर्सकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 50.39 टक्के वाटा आहे. शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण 6,76,57,88,990 म्हणजे 6 अब्ज 76 कोटी 57 लाख 990 शेअर आहेत. त्यातील 50.39 टक्के वाटा बाजूला काढला तर अंबानी कुटुंबियासह प्रमोटर्सकडे एकूण 3,32,27,48,048 शेअर्स म्हणजे 3 अब्ज 32 कोटी 27 लाख 48 हजार 48 शेयर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *