16/06/2024
Spread the love

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईच्या पावसातील तिचा पहिला भयानक अनुभव सांगितला. या पावसात तीन महागड्या गाड्या गमावल्याचा खुलासा तिने केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी याविषयी व्यक्त झाली. मुंबईच्या पावसाबद्दल कोणतीच कल्पना तिला नव्हती. “एवढा पाऊस पडू शकतो याची मला काहीच कल्पना नव्हती. मी जेव्हा सुरुवातीला मुंबईत कामाला यायचे, तेव्हा समुद्राजवळील घरात राहायचे. तेव्हा माझ्या घराच्या भिंतीतून पाणी यायचं आणि बुरशीमुळे माझं बरंच सामान खराब झालं होतं. पण मला पावसाळा आवडतो. हा माझा सर्वांत आवडता ऋतू आहे. कारण पावसामुळे हवेत गारवा पसरतो आणि बाहेर जेव्हा सरी कोसळतात, तेव्हा त्यांना पाहून माझं मन तृप्त होतं”, असं ती म्हणाली.
याच मुलाखतीत सनी लिओनीने पावसाळ्यातील तिचा सर्वांत वाईट अनुभव सांगितला. “मी पावसात माझ्या तीन महागड्या गाड्या गमावल्या आहेत. एका दिवसात दोन गाड्या वाहून गेल्या. ते फार भयंकर होतं. कारण भारतात जेव्हा तुम्ही भारतात आयात केलेल्या कार खरेदी करता, तेव्हा त्यावर भरभक्कम कर द्यावा लागतो. तीन गाड्यांपैकी एक आठ आसनी मर्सिडीज ट्रक होता. मी खुश नव्हते, पण ठीक आहे. अशा गोष्टी घडतात आणि आपण भौतिक गोष्टी बदलू शकतो असा विचार मी केला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. आता मी खास पावसाळ्यासाठी तयार केलेला भारतीय बनावटीचा ट्रक चालवते. मी चुकीची कार खरेदी केली होती आणि आता मला भारतात बनवलेल्या कार आवडतात”, असं ती पुढे म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *